रत्नागिरीतील त्या महिला डॉक्टरचा रिपोर्ट निगेटिव्ह

0

रत्नागिरीच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या प्रकरणातील काही महत्वाची तथ्य आता समोर येऊ लागली आहेत. काल जिल्हा रुग्णालयातील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने मला कोरोन सदृश्य लक्षणे आहेत व जिल्हा शल्यचिकित्सक माझे स्वाब तपासणीसाठी पाठवत नसल्याचा आरोप तक्रारीद्वारे केला होता. या आरोपाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. मात्र आता त्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. करोना सदृश्य लक्षणे जाणवत असताना हि महिला समाजात वावरली म्हणून निष्काळजीपणाचा आरोप ठेवत तिच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आज या प्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे. मात्र केवळ पूर्वापार असणाऱ्या वैयक्तिक वादातून जिल्हा शल्यचिकित्सकांना अडचणीत आणण्यासाठी हा या महिलेने कांगावा केला होता अशी चर्चा आता जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सुरु आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here