वीज वाहिनीचा धक्का लागल्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू

0

लांजा : मुख्य वीज वाहिनीचा विजेचा धक्का लागल्याने शहरातील एका इमारत बांधकाम कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. शहरातील डावारा वसाहत येथे के. पी. कन्स्ट्रक्शनकडून नवीन इमारतीच्या बांधकामावर असलेला छेदालाल उर्फ बुल्लर कल्लू बेन (३३ रा. मुत्तैर, नयाठेरा, उत्तरप्रदेश) या कामगाराला काम करतानाच विजेचा धक्का बसला. छेदालाल हा दारूच्या नशेत असताना त्याला हा विजेचा धक्का लागल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी मुख्य वीज वाहिनी या नवीन बांधकाम होत असलेल्या इमारतीला लागून असल्याने ती हटवावी, अशी मागणी इमारतीच्या ठेकेदाराने महावितरणकडे केली होती. मात्र, योग्यवेळी ती हटवली गेली नसल्याने हा अनर्थ घडला असल्याचे बोलले जात आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here