नवीन तंत्रज्ञानाचा पुरस्कार करत पत संस्थांनी नव्या युगातही आपला प्रभाव कायम ठेवावा : काकासाहेब कोयटे

0

रत्नागिरी : आज रत्नागिरी दौऱ्यावर काका साहेब कोयटे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पत संस्था चळवळीतील प्रतिनिधिंची बैठक आयोजित केली होती. त्या प्रसंगी बोलताना नव्या युगाचा सामना करण्यासाठी पत संस्थानी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन ग्राहकांना आर्थिक सेवा देण्याची पद्धती अबलबावी. स्पर्धेचं हे युग अनेक संधी घेऊन आलेलं आहे.पतसंस्था चळवळ ही प्रभावी व्यवस्था आहे आपण माहिती आणि तंत्रज्ञान वापरत या संधीचा लाभ घेतला पाहिजे. असे प्रतिपादन कोयटे साहेब यांनी केले.

15 वर्षाच्या राज्य पत संस्था फेडरेशन च्या कामाचा अहवाल उपस्थितांन समोर त्यांनी आपल्या खास शैलीत मांडला. ठेव सवरक्षण 101 चे दाखले NPA ची कालमर्यादा या सारख्या महत्वाच्या मुद्यावर त्यांनी भाष्य केले. रत्नागिरी ने राज्य पत संस्था चळवळीला अँड. दीपक पटवर्धनांन सारखा तज्ञ दिला त्यांच्या जवळ बोलता यावे नवीन संकल्पना वर चर्चा करता यावी या साठी रत्नागिरीत यायला मला खूप आवडते अस सांगत फेडरेशन मधील या सहकार्याची साथ मला आणि राज्य पत संस्था फेडरेशन ला खूप महत्वाची वाटते असे गौरवोद्गार काकासाहेब कोयटे यांनी काढले.

फेडरेशन च्या झेंड्या खाली सर्वजण सुसंघटित होऊन पत संस्थांची वाटचाल प्रशस्थ करू या असे आवाहन कोयटे यांनी केले.

या प्रसंगी काकासाहेब कोयटे यांचा जिल्हा फेडरेशन अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला तसेच मध्यवर्ती बँकेचे नव नियुक्त कार्यकारी संचालक ए .बी. चव्हाण यांचा ही गौरव करण्यात आला. या प्रसंगी बोलताना अँड पटवर्धन यांनी पत संस्था चळवळी समोरील प्रश्न आणि संधी याबाबत आपले विचार मांडले.

या प्रसंगी जिल्हा बँक संचालक रमेश कीर जिल्हापरिषद सदस्य संतोष थेराडे, संतोष पावरी, जनरल मॅनेजर डॉ. गिम्हवणेकर तसेच राजे शिर्के मॅडम यांचेसह जिल्ह्यातील अनेक संस्था चे पदाधिकारी संचालक व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत संस्था चे प्रश्न ही यावेळी विचारण्यात आले व त्यावर काका साहेब कोयटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पावरी यांनी केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:44 PM 05-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here