‘मगरींचे गाव’ म्हणून सोनगाव येणार जागतिक नकाशावर

0

रत्नागिरी : खेडच्या खाडीपट्ट्यात मगरींचे वास्तव्य असून कांदळवनांची बेटही विस्तारलेली आहेत. त्यांचे रक्षण करतानाच मगरींचे गाव म्हणून सोनगावला जागतिक नकाशावर आणण्यासाठी शासनाच्या वनविभाग व कांदळवन कक्षाने कंबर कसली आहे. या ठिकाणी पर्यटन व्यावसायाला चालना देण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने सोनगाव-भोईवाडीत वाशिष्ठी मगर सफारीचा शुभारंभ झाला आहे. एकावेळी फेरीबोटीमधून एकावेळी आठ जणांना एक तासाची सफर घडवून आणली जाणार आहे.

खेड तालुक्याच्या हद्दीत असलेल्या सोनगावमध्ये वीसहून अधिक मगरींचे वास्तव्य दिसून आले आहे. जलपर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांना मगर (क्रोकोडाईल) सफारीचे आयोजन करुन येथील गावच्या विकासालाही चालना देण्यासाठी रत्नागिरी वनविभाग, कांदळवन प्रतिष्ठान मुंबई व कांदळवन कक्ष रत्नागिरीने प्रयत्न सुरु केले आहेत. या माध्यमातून सोनगाव येथे कांदळवन सह-व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत सोनगाव येथे वाशिष्ठी-मगर सफारी सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात आली होती. कांदळवन प्रतिष्ठानकडून सोनगावला आठ आसनी मोटार बोट देण्यात आली आहे. सोनगाव भोईवाडी येथे 3 मे रोजी अक्षयतृतीयाच्या शुभ मुहूर्तावर वाशिष्ठी-मगर सफारी बोटीचा आरंभ झाला. सोनगावच्या सरपंच सौ. भारती पडवळांच्या हस्ते वाशिष्ठी’ बोटीचे पूजन केले. यानंतर मगर सफारी करण्यात आली व आलेल्या मान्यवरांना कांदळवन या बद्दल माहिती देण्यात आली.

कांदळवन कक्ष रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल राजेंद्र पाटील यांनी यावेळी उपजीविका निर्माण योजनेबद्दल माहिती दिली व पर्यटनबद्दल मार्गदर्शन केले. कांदळवन कक्षातर्फे जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच मिलिंद घोरपडे, तंटामुक्त अध्यक्ष नितीन खेराडे यांनी वाशिष्ठी मगर सफारी गटाला पर्यटनासाठी सहकार्य करण्याचे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी वनपाल उपरे, वनरक्षक अशोक ढाकणे, उपजीविका तज्ञ वैभव बोंबले, उपजीविका सहाय्यक अभिनय केळसकर, प्रकल्प समन्वयक श्रीमती क्रांती मिंडे, गौरांग यादव, स्वस्तिक गावडे, निमिशा नारकर उपस्थित होत्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:48 PM 05-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here