एस.टी.महामंडळाच्या रत्नागिरी एमआयडीसी येथील विभागीय कार्यशाळा या वर्कशॉपमध्ये अधिकारी वर्गाचा निष्काळजीपणा

0

जनता कर्फ्युमध्येही कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी केली जातेय सक्ती

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी : कोरोना या महाभयंकर साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी, आवश्यक असणाऱ्या शासनाच्या कोणत्याही सूचनांचे पालन न करता येथील सर्व व्यवहार ढळढळीत चालु आहेत. याठिकाणी शेकडो कामगार, जिल्ह्याच्या नऊ डेपोमधील वेगवेगळ्या ठिकाणाहुन रोज ये – जा करतात. येथील कर्मचाऱ्यांची कोणतीही फिकीर न करता त्यांना कोरोनाच्या या महाभयंकर काळात कामाला जुंपले आहे. अत्यावश्यक सेवेचा बाऊ करून याकाळात त्यांना कामावर कोणतीही सुरक्षितता आणि काळजी न घेता जुंपले गेले आहे. दरम्यान गेलो नाही तर नोकरी जाईल या भीतीने जीवावर ऊदार होऊन येथील कर्मचारी कामावर येत आहेत. जनता कर्फ्युमध्येही या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी केली जातेय सक्ती. उद्या रविवारी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आवाहन केल्यानुसार देशात बंद पाळला जात असताना येथील कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी सक्ती केली जात आहे. बहुतांश अधिकारी वर्ग हा परजिल्ह्यातील आहे. त्यामुळे त्यांना स्थानिक लोकांच्या आरोग्याशी काही देणघेणं नसल्यासारखे वागत आहेत. हा निष्काळजीपणा असाच चालू राहिला तर भयंकर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हे लोक इतके बेजबाबदार कसे वागु शकतात ? स्थानिक नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी, आणि वरिष्ठ प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे. जिल्हा विभाग नियंत्रक यांना देखील या गोष्टीचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here