पतीची भेट होताच नवनीत राणांना कोसळले रडू

0

मुंबई : मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यावरून झालेल्या वादानंतर समाजात तेढ आणि शांतता भंग केल्याबरोबरच राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा गुरुवारी अखेर कारागृहाबाहेर पडले.

तुरुंगातून सुटका होताच नवनीत राणा थेट लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या. रक्तदाब, मणक्याचा त्रास होत असल्यानं नवनीत राणांनी रुग्णालय गाठलं.

नवनीत राणा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर थोड्याच वेळात त्यांचे पती रवी राणा त्यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचले. रवी राणांना पाहून नवनीत राणांना अश्रू अनावर झाले. त्या रडू लागल्या. रवी राणांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. गुरुवारी सुटका झाल्यानंतर त्यांनी लिलावती रुग्णालय गाठलं आणि पत्नीची विचारपूस केली. बरेच दिवसांनंतर दोघांची भेट झाली. रवी राणांना पाहून नवनीत राणा ढसाढसा रडल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:14 AM 06-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here