खूशखबर! मान्सून यंदा 10 दिवस आधीच केरळमध्ये दाखल होणार; वरुणराजाचं आगमन यंदा लवकरच..

0

मुंबई : सध्या देशात उन्हाचा चटका वाढला आहे. दिवसेंदिवस तापमानात देखील वाढ होत आहे. अशातच देशातील नागरिकांसाठी एक खुशखबर आली आहे.

यावर्षी देशात 10 दिवस आधीच मान्सून दाखल होणार आहे. मान्सून 20 किंवा 21 मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यानंतर तो पुढील काही दिवसात देशाच्या उर्वरित भागात बरसणार असल्याचा अंदाज ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर पह्रकास्ट’ या संस्थेने वर्तवला आहे.

मान्सून दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होणार असल्याने ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भासत आहे. तसेच पिकांनाही पाण्याची गरज आहे, त्यामुळे अशा काळातच पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांना हा दिलासा म्हणावा लागेल. दरम्यान, दरवर्षी मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होतो. यंदा दहा दिवस आधीच मान्सूनची बरसात सुरु होणार आहे. बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलानुसार सध्या अरबी समुद्रात अँटी-सायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकर पोहचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज 14 एप्रिलला जाहीर केला होता. त्यानुसार यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे. यंदा देशात चांगला पाऊस राहणार असल्याने शेतकऱ्यांना एका प्रकारचा दिलासा मिळाला आहे. यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार असल्यानं ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. कारण दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. त्यामुळे सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. हवामान विभागाने अंदाज जाहीर केल्यानंतर आता युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर पह्रकास्ट या संस्थेने दहा दिवस आधीच मान्सून दाखल होणार असल्याचे म्हटले आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने 14 एप्रिलला जाहीर केला होता. हा पहिला अंदाज आहे. एकूण पावसाच्या 74 टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीत पडत असतो. फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाचा मानला जातो. पाऊसमान चांगला होण्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचे नवनवे उच्चांक गाठले जात आहेत. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गेल्या १२२ वर्षांती उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मान्सूनचे लवकर आगमन होणे, हा मोठा दिलासा ठरेल. मान्सूनचा पाऊस तळकोकणात कधी दाखल होणार, याचा अंदाज अद्याप हवामान खात्याने जाहीर केलेला नाही. मात्र, मान्सूनचा आजवरचा साधारण प्रवास लक्षात घेता केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मान्सून ७ जूनपर्यंत तळकोकणात दाखल होऊ शकतो. त्यानंतर चार दिवसांत म्हणजे ११ जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होऊ शकतो.

भेंडवळची भविष्यवाणी, राज्यात सर्वसाधारण पावसाचा अंदाज
भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार यंदा महाराष्ट्रात सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जून महिन्यात कमी पाऊस, जुलै महिन्यात साधारण पाऊस तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मात्र, शेतकऱ्यांना वर्षभर अवकाळी पावसाचाही सामना करावा लागेल, असे भाकीतही वर्तविण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:40 AM 06-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here