मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

0

बीड : परळी जिल्हा न्यायालयाने २००८ मधील एका प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. २००८ साली राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल होऊन हे प्रकरण न्यायालयात गेले होते. यानंतर राज ठाकरे यांना अनेकदा न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु, राज ठाकरे एकाही सुनावणीला हजर राहिले नव्हते. जामीन देऊनही सतत तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

यापूर्वी जानेवारी महिन्यातही बीड जिल्हा न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. मात्र, त्यानंतर पोलिसांकडून राज ठाकरे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, अलीकडच्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे राज ठाकरे यांच्याविरोधात काढलेल्या अजामीनपात्र वॉरंटला महत्त्व प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे न्यायालयाकडून सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी वेळ मागून घेणार का आणखी काही कायदेशीर मार्ग काढणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

तीन दिवसांपूर्वीच सांगलीतील शिराळा न्यायालयाकडूनही राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. ६ एप्रिल रोजी हे वॉरंट जारी करूनही अद्याप राज यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही कोर्टाने पोलिसांना विचारला होता. त्यामुळे आता या दोन्ही प्रकरणांमध्ये काय कारवाई होणार, हे पाहावे लागेल.

राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद पोलिसांकडून गुन्हा दाखल

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेतली होती. पोलिसांनी या सभेला काही अटी-शर्तींसह परवानगी दिली होती. मात्र, प्रत्यक्ष सभा घेताना पोलिसांनी घालून दिलेल्या १६ पैकी १४ नियमांचे उल्लंघन झाले होते. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कलम ११६, कलम ११७ आणि कलम १५३ अंतर्गत राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:47 PM 06-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here