मराठी माणसांच्याही मर्सिडीज असायला पाहिजेत; पण कष्टाच्या, चोरीच्या नको : संजय राऊत

0

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे हे चांगले व्यंगचित्रकार होते. मात्र, भाजपाने त्यांच्या व्यंगचित्राचा गळा घोटला. अनेक व्यंगचित्रकारांना हल्ली लाईनही वाचता येत नाही, तर काही व्यंगचित्रकार आपली लाईन बदलतात, असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.

ते पुण्यात बोलत होते. येथील भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी मर्सडीज कारच्या मुद्द्यावरुन अप्रत्यक्षपणे फडणवीस यांनाही लक्ष्य केलं. कारण, फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना मर्सडीज बेबी असं म्हटलं होतं.

पुण्यात बोलताना, हडपसरच्या या गल्लीत असे म्हणत संजय राऊत यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. नाशिक, ठाणे, पुणे येथील अशा गल्लीतूनच शिवसेना दिल्लीपर्यंत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. या गल्लीत कोणी मर्सिडीज चोर नसावेत. आमच्याही मर्सिडीज आहेत. मराठी माणसांच्या मर्सिडीज असायला पाहिजेत. पण, त्या कष्टाच्या चोरीच्या नकोत, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टोला लगावला.

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि युवासेना नेते तसेच राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगताना पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिद पतनावेळी शिवसैनिक नव्हता, असा दावा केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस १८५७ च्या लढ्यातही सहभागी असतील, असा प्रतिटोला आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंचा मर्सिडीज बेबी असा उल्लेख करून निशाणा साधला होता. संजय राऊतांनी हडपसर येथील सभेत मराठी माणसांच्या मर्सिडीज असायला पाहिजेत, असे म्हणत फडणवीसांना टोला लगावला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:44 PM 06-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here