मांडवी समुद्रकिनारी भेळ विक्रेत्याकडून पर्यटकांना मारहाण

0

रत्नागिरी : पाणीपुरी आंबट असल्याचे सांगितल्याच्या रागातून शहरातील मांडवी समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील माय-लेकाला तेथील भेळ विक्रेत्या बाप-लेकाकडून मारहाण व चाकूचा धाक दाखवून धमकी देण्यात आली. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वा. सुमारास घडली.

प्रियांक सचिन जाधव (१५), प्रतीक्षा सचिन जाधव (३५) या दोघांना मारहाण करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जाधव (३९, मुळ रा. काटवली देवरुख संगमेश्वर सध्या रा. नालासोपारा मुंबई) हे कुटुंबीयांसोबत मांडवी समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी प्रतीक्षा, मुलगा प्रियांक तसेच यश, नीलेश जाधव, पियुष जाधव, क्षितीज जाधव व अभिजित जाधव असे इतर कुटुंबीयही होते. मांडवीवर फिरताना त्यांची पत्नी आणि मुलगा ही दोघेच किनाऱ्यावरील भेळपुरीवाल्याकडे पाणीपुरी खाण्यासाठी गेले होते.

पाणीपुरी थोडी आंबट असल्याबाबत विकेत्याला सांगितले. त्याचा राग आल्याने विक्रेत्याने प्रियांकला मारहाण केली. त्यावेळी त्याची आई प्रतीक्षा मधे पडले असता भेळ विक्रेत्याने चाकू काढून त्यांना धाक दाखवला. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे पर्यटकांकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:47 PM 06-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here