रत्नागिरी उपपरिसर येथे “बौद्धिक संपदा हक्क” या विषयावरती कार्यशाळा

0

रत्नागिरी : लोकपयोगी नवनिर्माण केलेल्या वस्तू आणि मॉडेल इत्यादी चा बौद्धिक संपदा अधिकार मिळवणे हे संशोधकासाठी खूप गरजेचे असते. नवनिर्माण केलेल्या वस्तू आणि मॉडेल इत्यादी चे श्रेय त्या संशोधकाला मिळण्यासाठी बौद्धिक संपदा अधिकार हा खूप महत्वाचा आहे. बौद्धिक संपदा अधिकारामधील माहिती, प्रकिया आराखडा माहिती करून चरित्रकार डॉ. धनंजय कीर रत्नागिरी परिसरामध्ये 05 मे 2022 रोजी कार्यशाळेचे आयोजन केले गेले.

या कार्यशाळेसाठी श्री. कुलदीप जानगीर पेटंट पर्यवेक्षक, पेटंट ऑफिस, दिल्ली हे मानवसंसाधन व्यक्ती म्हणून लाभले होते. या कार्यशाळेमध्ये श्री कुलदीप जानगीर यांनी पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क इत्यादीविषयी मार्गदर्शन केले.

ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर, सहाय्यक कुलसचिव श्री. अभिनंदन बोरागावें यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळा यशस्वीपने पार पाडण्यासाठी रत्नागिरी उपपरिसरातील IPR कमिटीमधील सदस्य डॉ. पांडुरंग पाटील, डॉ. सतिश मांजरे, श्रीमती तौफिन पठाण, श्रीमती पूनम गायकवाड व इतर प्राध्यापक यांनी विशेष प्रयत्न केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:08 PM 06-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here