कोरोना व्हायरसमुळे युरोपियन फुटबॉलला फटका

0

फुटबॉल हा खेळ जगातील नंबर वन खेळ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे साहजिकच या खेळाच्या स्पर्धांमधून कोटय़वधी रुपयांची कमाई करता येते. युरोप यामध्ये अग्रस्थानी आहे. मात्र कोरोना व्हायरसमुळे युरोपियन फुटबॉल लीगलाच किक बसली आहे. इंग्लिश प्रीमियर लीग, ला लीगा, बुंडेस लीगा, सीरी ए, चॅम्पियन्स लीग व युरोपा लीग या स्पर्धांमध्ये मिळून 541 लढती प्रभावित झाल्या असून यामुळे युरोपियन फुटबॉलला तब्बल 33 हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेदरलॅण्डमधील केपीएमजी या अकाऊंड फर्मच्या अहवालात युरोपियन लीगला मोठय़ा आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे असे नमूद करण्यात आले आहे. या सर्व लढती रद्द झाल्यास 32 हजार 617 कोटी रुपयांच्या नुकसानाला त्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच ‘क्लब हर्ट ऑफ मिडलोथियान एफसी’ या स्कॉटिश क्लबने आपल्या खेळाडूंच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या संघातील फुटबॉलपटूंचे मानधन अर्धे करण्यात आले आहे. स्कॉटिश प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत हा संघ बाराव्या स्थानावर आहे. इंग्लिश फुटबॉल क्लबने 432 कोटींची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील छोटय़ा छोटय़ा क्लब्जना जास्तीतजास्त आर्थिक मदत याद्वारे करण्यात येणार आहे. कारण सामन्यांच्या आयोजनातून सर्वाधिक रक्कम छोटय़ा क्लब्जना मिळते. लढती रद्द झाल्यास त्यांना मोठय़ा नुकसानाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे अशा क्लब्जना मदतीची गरज आहे. त्यामुळे इंग्लिश फुटबॉल लीगकडून हा निर्णय घेण्यात आला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here