नोकरी लावण्याच्या निमित्ताने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : एचडीएफसी बँकेत नोकरीस लावता, असे आमिष दाखवून तरुणीची सुमारे १८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची ही घटना १३ मार्च रोजी दुपारी ३.३० ते १८ मार्च रोजी सकाळी ११ वा. कालावधीत घडली आहे. स्नेहा सिंग, पुरुषोत्तम पांडे आणि विवेक कुमार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात अर्पिता अरुण चव्हाण (२२, रा. रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. संशयितांनी अर्पिताला बँकेत नोकरीला लावतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी बँक खात्यात १८ हजार ९९ रुपये भरुन घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिसात तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here