गोवळकोट येथील स्वयंभू गणेश मंदिराचा आजपासून जीर्णोद्धार सोहळा

0

चिपळूण : शहरातील गोवळकोट येथील स्वयंभप श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा दि. ७, ८ व ९ मे रोजी आयोजित केला आहे.

तीन दिवस विविध धार्मिक व करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त शनिवारी गोवळकोट रोड येथील श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या कमानीपासून श्री गणेश मंदिरपर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे.

शनिवार ७ मे रोजी सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत कलश मिरवणूक, रविवार दि. ८ रोजी पहाटे ४ वाजता काकडा आरती, सकाळी ७ वाजता स्वयंभू श्री गणेश मंदिराचा कलशारोहण सोहळा आणि धार्मिक विधी गुरुवर्य ह.भ.प श्री भारती महाराज भागवत (देवाची आळंदी) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी ६ वाजता सार्वजनिक हरिपाठ व ७ वाजता गुरुवर्य ह.भ.प श्री भारती महाराज भागवत यांचे कीर्तन होणार आहे. रात्री १० वा. कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ हा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार दि. ९ मे रोजी सकाळी ७ वाजता श्रींवर अभिषेक, सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ६ वाजता सार्वजनिक हरिपाठ, सायंकाळी ७ वाजता किर्तनकार ह.भ.प. श्री. महेश महाराज महाजन (आळंदी) यांचे कीर्तन, रात्री १० श्री सोळजाई नमन मंडळ, देवरुख (बोटकेवाडी) यांचे नमन होईल.

या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गणेश मित्र मंडळ, गोवळकोट व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:03 AM 07-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here