तरुणांनी बेफिकीरपणा टाळून कोरोनाचे गांभीर्य लक्षात घ्यावे ; WHOचा इशारा

0

जिनिवाः कोरोना व्हायरसचा तरुणांना धोका नाही, अशी समज चुकीची असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अदनोम गेब्रेयेसस यांनी व्यक्त केले आहे. या जीवघेण्या व्हायरसचा धोका सर्वाधिक तरुणांना असून बेफिकीरीनं न घेता हे त्यांच्यासाठी जीवघेणे ठरु शकते, असा इशारा त्यांनी दिला. शिवाय त्यांच्यापासून इतरांपुढे जीवन आणि मरणाचा प्रश्न उद्भवू शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जगभरात कोविड 19 या आजारामुळे होणा-या मृतांमध्ये वयोवृद्ध, गर्भवती महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक आहे. तरुणांना या आजाराची लागण होते, मात्र प्रथम उपचार घेऊन यापासून ते बरे होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका तरुणांना नाही, अशी समज समाजामध्ये आहे. त्या पार्श्वभूमीवर डब्ल्युएचओच्या प्रमुखांच्या या विधानाला महत्व प्राप्त झालं आहे. कोरोनाची लागण होऊन मृत पावलेल्यांमध्ये वयोवृद्धांची संख्या ही अधिक जरी असली, तरी तरुणांना देखील या भयंकर आजाराची लागण झाली असल्याचं नाकारता येत नाही. शिवाय तुमच्या एक चुकीमुळे इतरांसाठी जीवन आणि मरणाचा प्रश्न उद्भवू शकतो, हे देखील लक्षात घेण्याजोगे असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कोविड 19 या आजाराबाबत जनजागृती करत असल्याच्या तरुणांचे आभार व्यक्त करताना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी एकत्र येणेही तितकेच महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here