कुणकेश्वर चरणी जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्यांची आरास

0

सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील कुणकेश्वर चरणी जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्यांची आरास करण्यात आली आहे.

ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिरात शिवलिंग, गाभारा आणि नदी सभोवताली देवगड हापूसची आकर्षक अशी आरास कोकणात हापूस आंब्याचा हंगाम सुरू आहे.

देवगड मधील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी ही आरास केलीय.

कुणकेश्वर गावचे ग्रामदैवत असलेल्या कुणकेश्वर चरणी आकर्षक अशी आंब्याची आरास सजवून देवगड हापूस भेट अर्पण केली

कुणकेश्वरमधील शंकराच्या पिंडी सभोवताली केलेल्या आकर्षक हापूस आंब्याची आरास पाहून आंबे खाण्याचा मोह आवरता येत नाही.

कुणकेश्वर मंदिर पांडव कालीन पुरातन मंदिर असुन याठिकाणी स्वयंभू पिंडी आहेत.महाशिवरात्रीच्या काळात कुणकेश्वर येथे तीन दिवस जत्रा भरते.कुणकेश्‍वराला दक्षिण कोकणची काशी असे संबोधले जाते.काशी येथे 108 शिवलिंगे आहेत तर कुणकेश्‍वर येथे 107 शिवलिंगे आहेत.

श्री देव कुणकेश्‍वराचे स्थान इ.स. 11 पूर्वीच प्रसिद्धीस आले होते. जवळजवळ 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरातही येऊन गेल्याची माहिती स्थानिक सांगतात.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:04 PM 07-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here