महत्वाची बातमी : जमीन तुकडा बंदीचा नियम औरंगाबाद खंडपीठाने केला रद्द

0

◼️ आता 1-2 गुंठे जमिनीची सुद्धा रजिस्ट्री होणार

जमीन खरेदी- विक्री करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आता तुम्ही 1- 2 गुंठे जमीनोची सुद्धा खरेदी- विक्री करू शकतात. यापूर्वी असलेली तीन गुंठ्यांची अट असणार नाही. कारण तुकडा बंदीचा नियम औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द करण्यात आला आहेत. त्यामुळे यापुढे तुकडा बंदी नियमामुळे होणारा त्रास संपणार आहे.

तुकडा बंदी नियमामुळे नागरिक त्रस्त होते. पण औरंगाबाद खंडपीठाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता 1-2 गुंठे जमिनीचा व्यवहार करता येणार आहेत. आपल्याकडे जमिनीचे कमी क्षेत्र जरी असेल तरी ते तुम्ही बिनधास्त विक्री किंवा खरेदी करू शकणार आहात.

राज्य मुद्रांक विभागातर्फे दिनांक 12 जुलै 2021 पासून जमीन खरेदी विक्री करण्यासाठी तुकडाबंदी नियम लागू केले होते. त्यामध्ये NA-44 वगळता इतर सर्व घरे, प्लॉटची रजिस्ट्री बंद करण्यात आली होती. तसेच जमिनीचे तुकडे करुनही विकण्यास बंदी होती व त्याची रजिस्ट्री देखील बंद होती. यासाठी महाराष्ट्र नोंदणी क्रमांक 44 (1) (ई) हा नियम ठेवला होता. त्यामुळेच नाईलाजानं असे घर आणि जमिनीची खरेदी-विक्रीचा व्यवहार बॉण्ड पेपरवर व्हायला लागला होता.

त्यामुळे या नियमाच्या विरोधात काही जणांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली होती. त्यावर औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला असून आता तुकडा बंदीमुळे होणारा त्रास संपणार आहे.

राज्यात तुकडेबंदी कायदा असल्याने खरेदीखत नोंदवण्यापूर्वी मंजूर केलेला पोट विभाग किंवा रेखांकन खरेदी दस्तां सोबत जोडलेला नसल्यास नोंदणीसाठी न स्वीकारण्याचे आदेश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांनी 12 जुलै 2021 रोजी परिपत्रकाद्वारे दिले होते.

त्यावर सुनावणी झाली असून हे परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. डी. धानुका, आणि एस. जी. मेहरे यांनी 5 मे रोजी रद्द केल्याने छाेटे प्लाॅटधारक आणि प्लॉटिंग व्यावसायिकांना खूप फायदा होणार आहे. त्यामुळे आता खरेदीखत नोंदणीचे व्यवहारचा मार्ग सुरळीत झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:08 PM 07-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here