रत्नागिरी : कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सतर्क राहण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, मास्क, सॅनिटायजरची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. नागरिकांच्या संरक्षणासाठी मास्क मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे येथील बाजारपेठत विविध प्रकारचे मास्क विकणारे पाहायला मिळाले. मारुती आळी, माळनाका, धनजी नाका येथे मास्क विकणाऱ्यांनी चांगला व्यवसाय केला. ३० रुपयाने हे मास्क विकले जात आहेत. नागरिकांनीही मास्क घेण्यासाठी गर्दी केली होती. तसेच शहरात मेडिकलमध्ये मिळणाऱ्या सॅनिटायझरचे प्रमाण कमी असल्यामुळे ज्या मेडिकलमध्ये सॅनिटायझर मिळते त्या ठिकाणी लोकांनी गर्दी केली जात आहे.
