न्यायालयात हँडवॉशचे वाटप

0

रत्नागिरी : अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्यावतीने जिल्हा न्यायालयातील कर्मचारी आणि वकिलांना लिक्विड हँडवॉशचे वाटप करण्याचा उपक्रम राबवला गेला. तसेच न्यायालयीन कर्मचारी संघ, बेलिफ संघ, वकील संघटना सदस्यांना कोविड १९ च्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन अध्यक्ष अॅड. अविनाश तथा भाऊ शेट्ये यांनी केले. न्यायालयात अनावश्यक गर्दी टाळण्याबाबत जिल्हा न्यायाधीशांचे आदेश सर्वांनी काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन केले. या वेळी अधिवक्ता परिषदेचे शाखा अध्यक्ष अॅड. भाऊ शेट्ये, सचिव सचिन रेमणे, कोषाध्यक्ष अॅड. संदेश शहाणे, तालुका कोषाध्यक्ष अॅड. नीलेश घैसास, अॅड. विजय झाडगावकर व ॲड. सचिन पारकर उपस्थित होते.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here