क्वॉरंटाइनमधील रुग्णांना थ्री स्टार रिसॉर्टची सुविधा पुरविणार : शिवाजीराव दौंड

0

रत्नागिरी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावच्या अनुषंगाने क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात येणाऱ्या संशयित रुग्णांना रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येणार असून त्यांना थ्री स्टार हॉटेलमधील सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी सांगितले. कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखणे, त्याला अटकाव करणे तसेच कोरोना व्हायरसचा उद्रेक होऊ नये यासाठी परदेशातून कोणीही नागरिक, आपले नातेवाईक जिल्ह्यात आले असतील तर त्यांची माहिती तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालय अथवा तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अथवा पोलीस यंत्रणेला द्यावी. अशा संशयित रुग्णांची तपासणी करून त्यांना रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येणार असून त्यांना थ्री स्टार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अशा प्रकारच्या संशयित रुग्णांनी, त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता त्यांची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी. खबरदारी म्हणून फक्त अशा संशयित रुग्णांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येणार आहे. मास्क व सॅनिटायझर विक्रीसाठी शासकीय दुकान उघडण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांमधील कामगारांच्या हालचालींवर निर्बंध आणण्यात येत आहेत. जहाजावरील प्रवाशांची जहाजामधून बंदरामध्ये व बंदरामधून जहाजामध्ये ने-आण होणार नाही. बंदरावरील व्यक्ती जहाजामध्ये प्रवेश करणार नाही, असा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये परिविक्षाधीन असलेल्या विद्यार्थ्यांनी करोना विषाणूंचा प्रादुर्भाव प्रतिबंधित करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here