तिसे शिगवणवाडी येथे समाजमंदिराचे उद्घाटन

0

खेड : तालुक्यातील तिसे शिगवणवाडी येथे बांधण्यात आलेल्या समाजमंदिराचे आणि पाखाडीचे उद्घाटन नुकतेच आ. योगेश कदम यांच्या हस्ते झाले.

तालुक्यातील तिसे शिगवणवाडीत समाजमंदिर व पाखाडी बांधून मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन आ. योगेश कदम यांनी त्यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमात सन २०२०-२१ योजनेंतर्गत समाजमंदिरासाठी ७ लाख व पाखाडीसाठी २ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. समाजमंदिर व पाखाडी बांधकाम पूर्ण झाल्यावर याचे उद्घाटन आ. योगेश कदम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, बावा चव्हाण, उपतालुकाप्रमुख अनंत काजारे, माजी सभापती रामचंद्र आईनकर, विभाग प्रमुख सुधीर कदम, संदीप कांबळे, सूर्यकांत कदम, प्रवीण घाणेकर, सरपंच अपूर्वा जाधव, उपसरपंच रुपेश शिगवण ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here