अस्मिता नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी किरण टिळेकर यांची बिनविरोध निवड

0

राजापूर : राजापूर येथील अस्मिता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. राजापूरच्या नूतन अध्यक्षपदी किरण टिळेकर यांची तर उपाध्यक्षपदी अशोक महाडेश्वर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीकरिता संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली होती. यामध्ये संचालक म्हणून सुरेश दिवटे, मधुकर टिळेकर, चंद्रशेखर सिनकर, रफीक बामणेकर, अशोक महाडेश्वर, धनश्री नाटेकर, अमित डोर्लेकर, किरण टिळेकर, गिता टिळेकर, अमजद बोरकर यांची निवड झाली होती. बुधवारी पतसंस्थेच्या कार्यालयात ही निवडणूक सहायक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी ए. आर. खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी नवनिर्वाचीत संचालक तसेच पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रसाद जाधव, रामदास आडिवरेकर, गणेश राणे, समिक्षा ठोंबरे, सहदेव पळसमकर आदी कर्मचारी वृंद उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here