निढळेवाडी येथील अपघातप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल

0

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावरील निढळेवाडी येथील हॉटेल मैत्री पार्क समोर दुचाकीला धडक देऊन दुखापत व अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश शिवराम परब (२३, देवगड, सिंधुदुर्ग) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परब हा आपल्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो घेऊन गोवा ते मुंबई असा जात होता. परब याने निढळेवाडी येथील हॉटेल मैत्री पार्क समोर आल्यावर टेम्पो अतिवेगाने, हयगयीने चालवून विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात दुचाकी व टेम्पोचेही नुकसान झाले. याबाबतची फिर्याद होमगार्ड रवींद्र सुकम यांनी दिली. त्यानुसार टेम्पो चालक गणेश शिवराम परब याच्यावर भादविकलम 279, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:39 PM 09-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here