मुख्यमंत्री म्हणून नाही तर उद्धव ठाकरेंनी राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून राज्यातील जनतेची काळजी घेतली. राजकीय निर्णयावर सर्व टाळ्या वाजवतील. त्यांनी एक वडील म्हणून जनतेची काळजी घेतली. त्यांचं काम इतिहासात नोंदवलं जाईल, अशा शब्दांत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा दिवस रात्र या लढाईत बिन्नीच्या शिलेदाराची भूमिका बजावली आहे, असंही संजय राऊत म्हणाले. जगात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना भारताने बऱ्यापैकी परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी असो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या लढाईला भावनिक टच दिला आहे, पण आपण हे युद्ध म्हणून देखील पाहात आहोत, असंही संजय राऊत यांनी यावेळी मान्य केलं.
