जिल्हा शासकीय रुग्णालयात ११ जण विलगीकरणामध्ये

0

रत्नागिरी : करोना आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात अकरा जणांना विलगीकरणासाठी ठेवण्यात आले आहे. काल ही संख्या दहा होती. आज त्यात एकाची वाढ झाली. रुग्णालयातून तपासणीनंतर घरीच विलगीकरणासाठी पाठविलेल्यांची संख्या ११ असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले. जिल्ह्यात परदेश प्रवासातून आलेल्या १६५ जणांना त्यांच्या घरीच विलगीकरणासाठी ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व बंदरांवर जहाजात चढ-उतार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व महामार्गांवर आठ तपासणी नाकी सुरू आहेत. सोबतच ३ मुख्य रेल्वेस्थानकांवर स्क्रीनिंग करण्यात येत आहे. महामार्गावरील तपासणी नाक्यांवर आज सकाळी साते वाजेपर्यंत एक हजार ४२९ वाहने, तर नऊ हजार ९४२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जीवनाश्यक सेवा वगळता सर्व लहान-मोठ्या औद्योगिक आस्थापना बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच बँकांसाठी कामकाजाची नियमावली निश्चित करणारे आदेशही बजावण्यात आले आहेत. करोनासंदर्भात रत्नागिरीच्या जिल्हा नियंत्रण कक्षाकरिता ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय उपलब्ध करून देण्यात आलेले नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक असे -(०२३५२) २२२२३३ आणि २२६२४८. दरम्यान, उद्या, रविवारी, (दि. २२ मार्च) जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली असल्याने औषधांच्या दुकानांसह सर्व आस्थापना बंद राहतील, असे सहाय्यक कामगार आयुक्तांनी कळविले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here