रत्नागिरी येथे १४ ते १६ मे दरम्यान विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शन व क्रिएटिव्ह ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रात करिअर संधीबाबत कार्यशाळेचे आयोजन

0

जाकादेवी /संतोष पवार : कोकण व्हिज्युअल आर्ट क्रिएटर,रत्नागिरी आणि मंथन द स्कूल आँफ क्रिएटिव्ह अँडव्हर्टायझिंग अँड आर्ट,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.१४ ते १६ मे या तीन दिवसीय कालावधीत रत्नागिरी शिर्के प्रश्नाला रंजन मंदिर येथे विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शन व क्रिएटिव्ह अँडव्हर्टायझिंग क्षेत्रातील करीअर संधी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून सदर कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री .श्री उदय सामंत यांच्याहस्ते दि.१४रोजी स.१०वा. होणार आहे.


या प्रदर्शनात मुख्यतः फाईन आर्ट, अँडवान्स ग्राफिक्स डिझाईन, जाहिरात, फोटोग्राफी,क्रिएटिव्ह आर्ट या सर्व क्षेत्राशी संबंधीत कोर्सेस व निरनिराळ्या करिअर संधी या विषयांना पुरक हे शिबीर असणार आहे.शिबीरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.खालील वाॅट्सअँप नंबर वर आपले नाव,शिक्षण,पत्ता,मोबा.नं. पाठवून आपली जागा निश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इ.१० वी पासून पुढील सर्वच विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतील.सदरचे क्रिएटिव्ह आर्टचे हे वर्कशाॅप मोफत आहे.


बदलत्या गतीमान जगाबरोबर नविन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कलेच्या क्षेत्रात आपले कलात्मक दर्जाचे अस्तित्व सिद्ध करुन करिअर निश्चित करण्याची हिच योग्य वेळ आहे.म्हणूनच योग्य वेळी योग्य भविष्य घडविण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आयोजकांनी केला आहे.


मंथन द स्कूल आँफ क्रिएटिव्ह अँडव्हर्टायझिंग अँड आर्टचे (मुंबई) डायरेक्टर सन्मा. प्रा.शशिकांत गवळी (G.D.Art,Dip.A.Ed.) यांच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील शाखांसह कलेचे दर्जात्मक शिक्षण व मुलांसाठी कलाक्षेत्रातील करीअर संधी पाहता याच धर्तीवर रत्नागिरी येथे हा शैक्षणिक उपक्रम सुरु करत असल्याची माहिती कोकण व्हिज्युअल आर्ट क्रिएटर,रत्नागिरी चे आयोजक व प्रसिद्ध कलाध्यापक संदेश पालये यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here