गुणरत्न सदावर्तेंना गावदेवी पोलिसांची नोटीस, पुन्हा चौकशी होणार

0

मुंबई : नुकतेच जेल भोगून आलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मुंबई पोलिस पुन्हा एकदा त्यांची चौकशी करणार आहेत. गुणरत्न सदावर्ते अटकेत असताना त्यांच्याविरोधात गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये अनेक तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यामुळे गावदेवी पोलिस सदावर्तेंची पुन्हा एकदा चौकशी करणार आहेत. पोलिसांनी सदावर्ते यांना ११० अंतर्गत नोटीस देखील पाठवली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याला सदावर्तेंना जबाबदार धरुन सदावर्तेंना अटक करण्यात आली होती. याप्रकरणात त्यांना जवळपास १६ दिवस जेलमध्ये रहावं लागलं. त्यानंतर जामीन मिळाल्यानंतर त्यांची जेलमधून सुटका झाली. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी एसटी कष्टकरी जनसंघ ही नवी संघटना स्थापन करुन सक्रिय राजकारणाच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. नव्या संघटनेची घोषणा करुन ४८ तासही उलटले नाहीत तोपर्यंत त्यांना पोलिसांची नवी नोटीस आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गुणरत्न सदावर्ते अटकेत असताना त्यांच्याविरोधात गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये अनेक तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यामुळे गावदेवी पोलिस सदावर्तेंची पुन्हा एकदा चौकशी करणार आहेत. पोलिसांनी सदावर्ते यांना ११० अंतर्गत नोटीस देखील पाठवली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:56 PM 11-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here