राज्यमंत्री बच्चू कडू यांना अकोला न्यायालयाकडून जामीन मंजूर

0

अमरावती : रस्ते कामात अपहार केल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीने दाखल केलेल्या प्रकरणात राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

त्यानंतर कडू यांनी अटकपूर्व जामिनासाठी अकोल्याच्या जिल्हा न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण देत दिलासा दिला होता. त्यानंतर, आता बच्चू कडू यांना प्रथमश्रेत्री न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर प्रथमश्रेणी न्यायालयाने कलम 156 (3) नुसार सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी सत्र न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर न्यायालयाने आज निकाल देत कडू यांना जामीन मंजूर केला आहे. यावेळी न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतरच सुनावणी केली. अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करुन पालकमंत्री बच्चू कडू यांनी 1 कोटी 95 लाखांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता.

दरम्यान जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 13 कामांना स्थगिती दिल्याने आता पालकमंत्री कडू यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचितने केली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवेधन पुंडकर यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने यामध्ये कमल 156 (3) नुसार पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पालकमंत्री कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पालकमंत्री कडू यांनी जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. “सत्र न्यायालयाने यामध्ये दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पालकमंत्री कडू यांना 9 मे पर्यंत जामीन मंजूर केला होता. या जामिनावर सुनावणी झाली असता न्यायालयाने पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, पालकमंत्री यांच्याकडून ऍड. बी. के. गांधी यांनी काम पाहिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:11 PM 11-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here