रत्नागिरीत तापमानात किंचित घट

0

रत्नागिरी : असनी चक्रीवादळाच्या प्रभावाने गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानात किंचित घट झाली.
त्यामुळे काही प्रमाणात उष्म्याचे प्रमाण कमी झाले.

दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस इतके होते. गेले दोन दिवस रत्नागिरीत हलक्या पावसाच्या सरी झाल्याने बुधवारी तापमानात १ ते २ अंशांची घट झाली.

रात्रीही कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस होते. बुधवारी दिवसभर मळभी वातावरणाने उन्हाचा दाह सरासरीपेक्षा कमी होता. बुधवारी जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश, तर संध्याकाळी ते किमान २६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:28 AM 12-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here