सावधान ! महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी

0

महाराष्ट्रात कोरोनाने दुसरा बळी घेतला आहे. मुंबईत 56 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात कोरोना फोफावत चालला आहे. राज्यात कोरानाबाधित रुग्णांचा आकडा आता 74 वर पोहोचला आहे. तर संपूर्ण देशभरात 300 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत कोरोनाबाधितरुग्णांची संख्या 64 होती. मात्र आज ही संख्या 74 वर पोहोचली आहे. मृत व्यक्ती परदेशातून आली होती. या व्यक्तीवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. अखेर आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुंबईत आज नव्याने 6 तर पुण्यात 4 रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here