शामराव पेजे महामंडळातर्फे कर्ज योजना

0

रत्नागिरी : समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आ‍र्थिक उन्नतीसाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. महामंडळाकडून थेट कर्ज योजना रु.01 लक्ष ही योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे. त्याचे कौंटुबिक वार्षिक उत्पन्न रु. 1 लक्षापेक्षा जास्त नसून जातीचा दाखला, राशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्रे आवश्यक आहेत.

कर्ज बिन व्याजी असून कर्ज परतफेडीचा कालावधी 4 वर्षे असणार आहे. कर्ज मंजूरीनंतर शासकीय जामीनदार व इतर वैधानिक दस्तावेज आवश्यक आहेत. कर्जासाठीचे अर्ज रु. १०/- मध्ये उपलब्ध आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी व इतर माहितीकरिता जिल्हा व्यवस्थापक प्रिती आर. पाटील मो.क्र.8484904637 या क्रमांकवर संपर्क साधावा.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:02 PM 12-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here