‘बावनदी पुलाच्या कठड्याच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करावे’

0

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील मेघी गावातील बावनदी पुलाच्या कठड्याच्या दुरुस्तीचे काम लवकर नाही झाले तर उपोषण करू, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. वारंवार मागणी करूनही या कामाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

देवळे देवरुख ह्या रस्त्याला मेघी गावातून जाताना बावनदीवर एक पूल लागतो. मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीमध्ये नदीचे पाणी या पुलावरून वाहिल्याने ह्या कठड्याची वाताहात झाली होती. ठिकठिकाणी कठडा मोडून रेलिंग वाहून गेले होते. त्यामुळे सध्या या पुलाला भक्कम कठडा नाही.

अनेक ठिकाणी बांबू बांधून तात्पुरता सोर केली आहे. नदीपात्र खोल असल्याने येत्या पावसात हा पूल कठड्याविन वाहतुकीसाठी धोकादायक ठरणार आहे. हा कठडा तातडीने दुरुस्त करण्यात यावा ह्यासाठी सरपंच प्रमिल चव्हाण आणि ग्रामपंचायत सदस्ट आणि ग्रामस्थांनी वारवार प्रयल केले होते. पण प्रशासनाकडून त्यार्च दाखल घेतली गेली नाही.

त्यामुळे येत्या आठवड्याभरात ही डागडुज कायमस्वरूपी न झाल्यास सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, इशारा देण्यासंदर्भातील पत्र देवरुख सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:52 AM 13-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here