श्री सत्यनारायण सन्मित्र सेवा मंडळ मळण येथे विशेष सन्मान सोहळा

0

गुहागर : श्री सत्यनारायण सन्मित्र सेवा मंडळ(रजि.)मळण कुंभारवाडी या मंडळाची सार्वजनिक महापूजा दिनांक 8 मे 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती. त्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्रीराम देवस्थळी गुरुजी यांनी भूषविले.

मंडळाचे संस्थापक श्री नारायण शेठ साळवी महिला मंडळ अध्यक्ष राजश्री जाधव, पाहुणे रवींद्र इंदुलकर गुरुजी, सुमंत भिडे, मदत ग्रुप खेडचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी, मैत्रिबंध प्रतिष्ठानचे नितीन पागडे, कौस्तुभ हुईलगोल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सदर सन्मान सोहळ्यात मंडळातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.

विशेष सन्मान सोहळयात प्राथमिक शिक्षक श्री रवींद्र इंदुलकर यांची सेवा निवृत्ती झाल्यामुळे विशेष सन्मान केला.
कोरोना काळात विशेष योगदान दिल्याबद्दल डॉ.कौस्तुभ हुईलगोल ,श्री रहीम मेमन, सौ.लाकडे मॅडम ,आशा सेविका सौ.अश्विनी सोलकर आणि शुब्रा जाधव यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खेडचे मदत ग्रुपचे अध्यक्ष श्री प्रसाद गांधी यांना मुंबई गोवा महामार्ग देवदूत म्हणून सन्मानित केले. . शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कु.श्रीराज रमेश साळवी,कु.निखिल प्रमोद साळवी ,कुमारी अदिती रमाकांत साळवी कुमारी पायल प्रकाश शिगवण कु रुद्र रविंद्र पालकर कु अभिनव निलेश धामणस्कर कु.विश्वनाथ चंद्रकांत धामणस्कर यांना सन्मानित केले.
सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मैत्रिबंध प्रतिष्ठान आणि चंडिकाई पालखी नृत्य पथक मळण यांना सन्मानित करण्यात आले .या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव श्री प्रमोद साळवी यांनी केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:56 AM 13-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here