ग्रंथालये अधिनियमात होणार चार सुधारणा

0

रत्नागिरी : महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७ व त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेले चार नियम यामध्ये कालानुरुप सुधारणा करण्याचा निर्णय ग्रंथालय संचालनालयामार्फत घेण्यात आला आहे. या नियमामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सहायक अनुदान आणि इमारत व साधनसामग्री अनुदाने यासाठी मान्यता) नियम, १९७०, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय संघ (सहायक अनुदानासाठी मान्यता देणे) नियम, १९७१, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये, राज्य ग्रंथालय परिषद व जिल्हा ग्रंथालय समित्या (कामकाजाची कार्यपद्धती) नियम, १९७३, महाराष्ट्र ग्रंथालयांना (संशोधन व साहित्यिक परिसंस्थांची ग्रंथालये) सहायक अनुदानाकरिता मान्यता देण्याचे नियम, १९७४ याचा समावेश आहे. ग्रंथालय चळवळीशी संबंधितांना यासाठी जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, प्रस्तावित अधिनियम व नियमांमध्ये सुधारणा, बदल सुचवावेत. बदल, सुधारणा सांगताना त्याचे बाबनिहायसकारण समर्थन करणे आवश्यक आहे. सुधारणा, अभिप्राय, मत, सूचना याबाबत पत्रव्यवहार समक्ष, टपाल, ईमेलद्वारे ग्रंथालय संचालनालयाच्या अधिपत्याखालील जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांनी ३१ ऑगस्टपर्यंत सादर करावा.याबाबतचा संपूर्ण तपशील ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here