मुंबई : “लवकरच राज्याचं आरोग्य धोरण जाहीर करू, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
याबरोबरच राज्याचं हे नवं आरोग्य धोरण राष्ट्रीय आरोग्य धोरणाशी सुसंगत असेल असे देखील राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
राजेश टोपे गुरुवारी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य परीषदेत बोलत होते. या परिषदेत राज्यातील अनेक योजनांबाबत चर्चा झाली. खासगी दवाखान्यात असणाऱ्या काही गोष्टी आता सरकारी दवाखान्यात देखील राबवण्याबाबत या परिषदेत निर्णय घेण्यात आला.
राजेश टोपे म्हणाले, “ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये 10 टक्के फ्री बेड ठेवणे आणि 10 टक्के कमी दरात बेड उपलब्ध करणे अपेक्षित आहे. मात्र , हे होत नाही. आम्ही त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. तसेच अनेक रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजना नसल्याचे उत्तर देतात. मोठ्या रुग्णालयात ही योजना असायला हवी याबाबात आम्ही लवकरच योग्य निर्णय घेणार आहोत. शिवाय तृतीय पंथीयांच्या सर्जरी फ्री करण्याबाबत देखील आम्ही लवकरच निर्णय घेणारं आहोत.”
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:56 PM 13-May-22