रत्नागिरी : कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हाभरात कडकडीत बंद आहे. संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्तासाठी पोलीस दल कार्यरत आहे. कुठेही चहा पाण्याची व्यवस्था नसल्याने हि गरज ओळखून कर्तव्य भावनेतून हॉटेल विवेकचे देसाई बंधू पुढे आले आहेत. हॉटेल विवेक कडून, आज बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पाणी व चहा व्यवस्था करण्यात आली आहे.
