मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज नवी दिल्लीतील एका प्राचीत हनुमान मंदिरात महाआरती करण्यासाठी रवाना झाल्या आहेत.
राणा दाम्पत्याच्या ठाकरे सरकारविरोधातील या आंदोलनावर टीका करताना राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी नवनीत राणा यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. कोण नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांना का एवढं महत्व द्यायचं?, असं विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत.
“कुणीही उठसूट मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीचा अपमान करतो हे कितपत योग्य आहे? आणि कोण आहेत या नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांच्याबद्दल सर्वांना माहित आहे. खोटं जात प्रमाणपत्र दाखवून द्या खोट्या खासदार झाल्या आहेत. त्यांना एवढं महत्व द्यायची काहीच गरज नाही. माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी हे दाम्पत्य असा प्रकार करत असतं”, असं विद्या चव्हाण म्हणाल्या.
विद्या चव्हाण यांनी यावेळी रवी राणा यांच्यावरही खरमरीत शब्दात टीका केली. “राणा दाम्पत्य अमरावतीत काय करतं हे सर्वांना माहित आहे. रवी राणा यांनी निवडणुकीवेळी सर्व महिलांना प्रेशर कुकर वाटले होते. त्यांना झाकणच नव्हतं म्हणून सगळ्या महिला त्यांना जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. त्यावर रवी राणांनी तुम्ही मला मतदान करा मग झाकण देतो असं म्हटलं होतं. यावरुन यांची कुवत लक्षात येते”, असं विद्या चव्हाण म्हणाल्या.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:00 PM 14-May-22