भरणे काशीमठ येथे ट्रकला दुचाकीची धडक; दोघेजण गंभीर जखमी

0

खेड : राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवार दि. १३ रोजी भरणे येथील श्री काशीमठसमोर दुचाकीने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबईच्या दिशेने जाणारा टक भरणे काशीमठ समोरील दुभाजक पार करून खेडच्या दिशेने वळत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने ट्रकला जोरदार धडक दिली. अपघातात दुचाकीवर स्वार एक महिला व पुरुष दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी १०८ व शिवसेना रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:00 PM 14-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here