उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेने केली ‘ही’ मागणी

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सभा, वांद्रे पूर्व येथेल बीकेसी मैदानात जाहीर सभा होणार आहे.

आजच्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे कुणाचा समाचार घेणार? याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शिवसेना कार्यकर्ते येणार आहेत.

भोंगा, हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. एक ना अनेक मुद्द्यांवरुन गेले काही दिवस राज्याचे राजकारण चांगलंच तापलेलं आहे. गेल्या दोन महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा घेत महाविकास आघाडी आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर आज उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे लक्ष लागून आहे.

उद्धव ठाकरेंच्या आज होणाऱ्या सभेपूर्वी मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी एक मागणी केली आहे. उद्धव ठाकरेंची आज होणारी सभा म्हणजे ‘टोमणे सभा’ आहे. उद्धव ठाकरेंनी आज होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यात औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करावं, असं योगेश चिले यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:53 PM 14-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here