साखरपा येथे गाळ उपशाला प्रारंभ; ‘नाम’ची मदत

0

साखरपा : साखरपा येथील नदीच्या गाळ उपशाला प्रारंभ झाला आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीपात्र पुन्हा एकदा गाळाने भरले होते. नाम फाऊंडेशनने यासाठी मोठे सहकार्य केले आहे.

मागील वर्षी काजळी नदीच्या गाळ उपशाचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले होते. नाम फाऊंडेशन, दत्त देवस्थान आणि दत्तसेवा पतसंस्था तसेच कोंडगाव ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसभागातून बाजारपेठेलगत असलेल्या नदीपात्रातून गाळ काढण्याचे काम करण्यात आले होते. त्यामुळे काजळी नदीने मोकळा श्वास घेतला होता. यामुळे पावसाळ्यात पूर आला तरी पाणी साचले नव्हते. त्यामुळे नुकसानही झाले नाही. पण गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीपात्र गाळाने पुन्हा भरून गेले. येथील पात्रातील डोह आणि कोंडी पुन्हा भरून गेल्या. हा गाळ उपसा करण्याचे काम पुन्हा एकदा हाती घेण्यात आले आहे.

यासाठी नाम फाऊंडेशनने मोठी मदत केली असून, कोंडगाव ग्रामपंचायत आणि येथील ग्रामस्थांच्या लोकसहभागातून हे काम हाती घेण्यात आल्याचे व्यापारी संघटचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:56 AM 16-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here