अभिनेत्री केतकी चितळेवर पवार समर्थकांचा हल्ला

0

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान कळंबोली पोलिस स्टेशनच्या बाहेर तिच्यावर अंडी आणि शाईफेक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचे बोलले जाते.

अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कथीत आक्षेपार्ह टीका केल्याचा आरोप आहे. केतकीने “तुका म्हणे पवारा नको उडवू तोंडाचा फवारा ऐंशी झाले आता उरक वाट पहातो नरक..” अशी कविता केतकीने पोस्ट केली होती. त्यानंतर केतकीच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान ठाणे पोलिस तिला ताब्यात घेत असतानाच कळंबोली पोलिस स्टेशनच्या बाहेर केतकीवर अंडी आणि शाई फेकण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘केतकी हाय हाय’ अशा घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादींच्या महिला कार्यकर्त्यांकडून अंडी आणि शाईफेक करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:28 PM 16-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here