गिमवी-देवघर येथे छत्रपती संभाजीराजांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

0

माखजन : गुहागर येथील, क्षत्रिय ज्ञाती मराठा समाज संघटना, गुहागर संलग्न क्षत्रिय मराठा युवा संघटना, गुहागर या संघटनेमार्फत प्रथमच स्वराज्याचे धाकलं धनी, स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव – गिमवी/ देवघर या ठिकाणी उत्साहात साजरा झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणूनमराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक श्री.सुधीर भोसले उपस्थित होते.
प्रमुख वक्त्या म्हणून मराठा क्रांतीमोर्चा आणि राज्यस्तरीय व विद्यापीठस्तरीय वक्त्या सौ.अमृता सुरज शिंदे ,गुहागर या उपस्थित होत्या. सौ अमृता शिंदे यांनी ओघवत्या वक्तृत्व शैलीत अख्खे संभाजी राजांचे चरित्र उपस्थितांसमोर मांडले. शिवाय आपल्या बहारदार आवाजात पोवाडा सादर केला. पोवाड्याला उपस्थितांची विशेष दाद मिळाली.सौ अमृता शिंदे यांचा या कार्यक्रमात सन्मान देखील करण्यात आला.

तसेच क्षत्रिय ज्ञाती मराठा समाज संघटना गुहागर या संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्री.प्रकाश शिर्के, उपाध्यक्ष अनिल शिंदे,
सचिव श्री.अमिश कदम, सदस्य श्री.जगदीश साळवी, श्री. संकेत साळवी, माजी सदस्य डॉ. श्री.भाई सकपाळ या व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या, वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच शिवप्रतिमेचे पूजन आणि संभाजीमहाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.विराज सकपाळ, श्री.जय शिर्के, श्री. शैलेश पवार, श्री.विक्रम कदम, श्री. दिनेश कदम, श्री.अक्षय सकपाळ, श्री.अमिश कदम, श्री. संकेत साळवी, श्री.संदेश महाडिक, कु.निखिल साळवी या युवा बांधवांचे विशेष सहकार्य लाभले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:28 PM 16-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here