मुंबईतील लोकलमधून रोज लाखो ये-जा करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा सर्वाधिक धोका मुंबईत निर्माण झाला आहे. ही परिस्थिती पाहता राज्य सरकारने लोकल प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकल ट्रेन प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. लोकलमधून आता सर्वसामान्य लोकांना प्रवास करता येणार नाही. उद्यासून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि मेडिकल इमर्जन्सी असणाऱ्यांनाच फक्त ओळखपत्र दाखवून रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी सर्व लोकल स्थानकांवर विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबवण्यासाठी २२ ते ३१ मार्च या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल प्रवास बंद करण्यात आल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे.
