मेर्वी येथे योग शिबिराला प्रतिसाद

0

पावस : भूमिपूत्र ग्रामविकास संघटना मुंबई-रत्नागिरी यांच्यातर्फे मेर्वी येथे नुकतेच योग शिबिर पार पडले. या शिबिरात संघटनेचे मुंबई शाखेचे अध्यक्ष रवींद्र कुरतडकर यांनी स्वतः योगा आणि प्राणायाम यांचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिके करून दाखविली.

यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष वामनराव मेस्त्री यांनीसुद्धा योगाबद्दल आपले विचार मांडले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी जयवंत नवाले, सुनील नवाले, राजू म्हादये, राकेश खरडे, विकास कुरतडकर यांनी मेहनत घेतली.

या शिबिरात पोलिस पाटील शैलेश कुरतडकर, राजेश गुरव, बाबाजी कुरतडकर, नारायण मेस्त्री यांची उपस्थिती लाभली. या शिबिराचा लाभ लहान मुले, महिला तसेच वृद्धांनी घेतला. या उपक्रमाचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here