अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक

0

मुंबई : मराठी सिनेक्षेत्रातील अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीचा व्हिडिओ समोर आला आहे. मध्यरात्री २ च्या सुमारास अज्ञातांनी पार्किंगमध्ये असलेल्या गाडीवर हल्ला केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं. या प्रकरणी एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. दरम्यान, माध्यमांशी बोलताना सुशांत म्हणाला की, ‘मध्यरात्री २ च्या दरम्यान एका अज्ञाताने हल्ला करून गाडीची काच फोडली. त्याने असं का केलं हे तर मला माहीत नाही, पण मी याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल करणार आहे.’

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:04 PM 16-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here