भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

0

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अनु. जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्याथ्यांनी सन २०२०-२१ व २०२१२२ या शैक्षणिक वर्षाकरिता लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याकरिता ३१ मे २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

(सर्वसाधारण विद्यार्थ्यांकरिता ५०% पेक्षा जास्त गुण तसेच दिव्यांग विद्यार्थ्याकरिता ४०% गुण), या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या अनु. जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्याचा निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. अर्ज ३१ मे २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील.

अपूर्ण भरलेले आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील. विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, ता. जि. रत्नागिरी यांच्याकडे संपर्क साधावा.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:21 PM 16-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here