रत्नागिरीत १९ ते २१ मे दरम्यान रत्न कृषि महोत्सव, पशुपक्षी प्रदर्शन

0

रत्नागिरी : उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. त्यांच्यासाठी आणि स्थानिक शेतकर्यांना मार्गदर्शक असा रत्न कृषी महोत्सव आणि पशुपक्षी प्रदर्शन १९ ते २१ मे या कालावधीत रत्नागिरीमध्ये प्रमोद महाजन क्रीडा संकुलात होणार आहे.

यामध्ये सव्वाशेहून अधिक स्टॉल लावले जाणार असून हापूस विक्रीला जास्तीत जास्त संधी दिली जाणार आहे. याचे आयोजन कृषी विभाग, जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमान केले आहे.

कोकणातील हापूसला ग्राहक मिळवून देण्यासाठी आंबा महोत्सवाचे दरवर्षी नियोजन केले होते. याच धर्तीवर चार वर्षांपूर्वी कृषी विभागाकडून रत्न कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यास प्रारंभ केला.

यासाठी जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद केली जाते. कमीत कमी खर्चात नियोजन करून शेतकर्यांची उत्पादने विकण्यासाठी हे विक्री व प्रदर्शन कृषी विभाग करत असते. करोनातील परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांत प्रदर्शन झाले नव्हते; मात्र निर्बंध शिथिल झाल्यानंतर जिल्हा नियोजनमधून दहा लाख रुपयांचा निधी महोत्सवातील स्टॉल सुविधांसाठी ठेवण्यात आला आहे. उपलब्ध निधी अपुरा असल्यामुळे जिल्हा परिषदेतून काही निधी तरतूद करण्यात आली आहे.

महोत्सवात सर्वसाधारणपणे सव्वाशे स्टॉलचे नियोजन केले आहे. त्यातील पंचवीसहून अधिक स्टॉल आंबा बागायतदारांना ठेवले जातील. हापूसच्या खरेदी-विक्रीसाठी पर्यटकांनी येथे यावे. यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह ठिकठिकाणी प्रचार, प्रसार केला जाणार आहे. काही स्टॉल महिला बचत गटांना तर खते, कीटकनाशके व बियाण्यांच्या विक्रीची स्वतंत्र दालने ठेवली जाणार आहेत.

जिल्ह्यातील शेतकर्यांकडील विविध जातींच्या पशूंचेही प्रदर्शन याठिकाणी लावण्यात येणार आहे. शेतकर्यांना मार्गदर्शक ठरतील असे परिसंवाद ठेवण्यात आले आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:15 AM 17-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here