देवरूख सोसायटीवर महाविकास आघाडीचा झेंडा

0

रत्नागिरी : अत्यंत चुरशीच्या झालेल्या देवरूख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. सर्वच्या सर्व जागी महाविकास आघाडी पुरस्कृत सहकार पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत.

या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत सहकार, भाजप-मनसे पुरस्कृत श्री देवी सोळजाई परिवर्तन पॅनेल आणि शेतकरी विकास पॅनेल रिंगणात होते. काल दिवसभर मतदान झाले, तर रात्री मतमोजणी झाली. आज पहाटे २ वाजता निकाल जाहीर झाला. त्यात सर्व १३ जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली.

विजयी झालेले उमेदवार – हानिफ हरचिरकर, संतोष लाड, बाळू, ढवळे, प्रफुल्ल भुवड, मुन्ना थरवळ, सुबोध पेडणेकर, पप्पू नाखरेकर, राजेंद्र गुरव, रवींद्र जागुष्टे, सुनील सावंत, सुजाता कांगणे, प्रियांका जागुष्टे, राजेंद्र पंदेरे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:21 PM 17-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here