आरोग्याच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरु…

0

रत्नागिरी: कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जे पोलीस कायम तैनात असतात ते आज नागरिकांच्या आरोग्यासाठी तैनात असल्याचे चित्र पूर्ण जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. सुमारे पंधराशे पोलीस नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी भर उन्हातून रस्त्यावर तैनात झाले आहेत. यात अधिकाऱ्यांपासून ते हवालदारांपर्यंत एकजात सर्वांचा समावेश आहे. रत्नागिरी मारुती मंदिर येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड आणि वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते आणि सर्व कर्मचारी तैनात झाले आहेत. खरोखरच या सर्वांना सलाम…सण असो किंवा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न नागरिकांच्या सुरक्षेखातर स्वतःचे घर सोडून कायम कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलीस दलाला सलाम. आज सायंकाळी ५ वाजता यांच्या प्रती देखील आपण आभार व्यक्त करूया.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here