लांजा शहरात पेट्रोलचा तुटवडा; वाहनचालकांची गैरसोय

0

लांजा : शहरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

एक पेट्रोल पंप दोन महिन्यापासून बंद असून सुरू होण्याबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे एकाच पेट्रोल पंपावर ताण पडत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

लग्नसराई आणि चाकरमान्यांच्या आगमनामुळे पेट्रोल-डिझेलच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. पेट्रोलच्या तुटवड्यामुळे लांजा शहरातील वाहनचालक, नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:03 PM 17-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here